Advertisement

डब्ल्युडब्ल्युई सुपरस्टार 'जेबीएल' मारणार मॅजिक बसच्या मुलांशी गप्पा


डब्ल्युडब्ल्युई सुपरस्टार 'जेबीएल' मारणार मॅजिक बसच्या मुलांशी गप्पा
SHARES

माजी प्रोफेशनल डब्ल्युडब्ल्युई रेसलर जाॅन ब्रॅडशाॅ लेफिल्ड (जेबीएल) २६ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील टेक्सास येथून मुंबईत दाखल होत आहे. 'मॅजिक बस' या स्वयंसेवी संस्थेच्या मुलांसोबत ब्रॅडशाॅ गप्पा मारणार आहे.


कुठे आहे कार्यक्रम ?

हा कार्यक्रम मंगळवारी समर्थ व्यायाम मंदिर, शिवाजी पार्क, दादर येथे सकाळी १०.३० वाजता होणार आहे.


कोण आहे 'जेबीएल'?

'जेबीएल'ने २००९ मध्ये प्रोफेशनल रेसलिंगमधून निवृत्ती घेतली होती. तेव्हापासून निवेदकाच्या भूमिकेत दिसणाऱ्या 'जेबीएल'ने काही दिवसांपूर्वीच 'स्मॅकडाऊन'मधूनही निवृत्तीची घोषणा केली. प्रतिस्पर्धी आणि इतर सहकाऱ्यांची थट्टा करणारा म्हणूनही 'जेबीएल'ची ओळख आहे.

'जेबीएल' ने आपल्या करिअरमध्ये एकूण २४ चॅम्पियनशीप जिंकले आहेत. त्यात १ डब्ल्युडब्ल्युई चॅम्पियनशीप, १ युनायटेड चॅम्पियनशीप, १ युरोपियन चॅम्पियनशीप, १ इंटरकाॅन्टीनेंटल चॅम्पियनशीप ३ टॅग टीम चॅम्पियनशीप आणि १७ हार्डकोर चॅम्पियनशीपचा समावेश आहे.

सध्या डब्लडब्ल्युईच्या चाहत्यांना 'नो मेरिसी' च्या विशेष भागाची प्रतिक्षा लागली आहे. या भागात डब्लडब्ल्युई सुपरस्टार जाॅन सीना निवृत्तीची घोषणा करेल, असेही म्हटले जात आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा