फ्रॉयन्ड्स एससी संघाची बाजी रिंक हॉकी स्पर्धेत

 Bandra
फ्रॉयन्ड्स एससी संघाची बाजी रिंक हॉकी स्पर्धेत
Bandra, Mumbai  -  

कार्मेल स्पोर्टस् कमिटीने आयोजित केलेल्या माऊंट कार्मेल रिंक हॉकी टुर्नामेंट स्पर्धेत शुक्रवारी महिलांच्या अंतिम सामन्यात फ्रेन्डस् एससी विरुद्ध सेंट्रल रेल्वेमध्ये झालेला सामना खूप रंगतदार ठरला. फ्रेन्ड्स एससीच्या मुलींनी सुरुवातीपासून गोल करत सेंट्रल रेल्वेच्या खेळाडूंना घाम फोडला. फ्रेन्ड्स एससीने सेंट्रल रेल्वेचा 6-5 असा पराभव केला. हे सामने माऊंट कार्मेल चर्च, वांद्रा येथे खेळवण्यात आले. 

या अटीतटीच्या लढतीत सेंट्रल रेल्वेच्या मुलींनी देखील कमालीची कामगिरी केली. पण त्यांना विजय मिळवता आला नाही. सेंट्रलच्या जमीला बानो 2, प्रतिभा 1 आणि कविता 2 यांनी असे गोल केले. फ्रेन्ड्स एससीच्या ममता पासी 2, मधू पाटील 2 आणि भाग्यश्री अग्रवालने 2 गोल करत संघासाठी विजयी कामगिरी केली. सामन्याच्या पूर्ण वेळेत टाय ब्रेकर 3-3 ने बरोबरीत झाली होती. पण त्यातूनही फ्रेन्ड्स एससीने विजय प्राप्त केला. या सामन्यात फ्रेन्ड्स एससीची नूट एस ही उत्कृष्ट खेळाडू ठरली, तसेच प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून ममता पासी (फ्रेन्ड्स एससी) आणि उत्कृष्ट गोलकीपर म्हणून वल्लखी दळवी (सी व्ह्यू) ही ठरली.

Loading Comments