जॉर्ज ११ संघाला विजेतेपद


  • जॉर्ज ११ संघाला विजेतेपद
  • जॉर्ज ११ संघाला विजेतेपद
  • जॉर्ज ११ संघाला विजेतेपद
  • जॉर्ज ११ संघाला विजेतेपद
  • जॉर्ज ११ संघाला विजेतेपद
SHARE

रॉनीचा वाडा - कांजुरमार्गमधील रॉनीचा वाडा येथील मैदानावर श्रद्धा सबुरी मित्र मंडळातर्फे दिवस-रात्र अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी आणि रविवारी दिवस-रात्र मुंबईतील नामांकित १६ संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात कांजुरमार्गमधील पुश्कर ९ राहूल आणि जॉर्ज ११ हे दोन संघ फायनलमध्ये पोहचले. अंतिम सामन्यात जॉर्ज ११ संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला आमदार सुनिल राऊत यांच्या हस्ते २० हजार रुपये रोख आणि चषक, तर उपविजेत्या संघाला १० हजार रुपये रोख आणि चषक देऊन गौरवण्यात आले. तसंच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आल्याचं आयोजक विष्णू गाडे यांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या