Advertisement

IPL 2024 साठी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे कॅप्टनपद भूषवणार

रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या कॅप्टनपद भूषवणार

IPL 2024 साठी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे कॅप्टनपद भूषवणार
SHARES

मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणारा रोहित शर्मा यापुढे पुढील हंगामात या संघाचे नेतृत्व करणार नाही. या हंगामात गुजरातमधून परतलेला हार्दिक पांड्या आता आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे कॅप्टनपद भूषवताना दिसणार आहे.

मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा आपल्या संघात स्थान दिले होते. पण त्यावेळी रोहित शर्मा हा मुंबईचा कर्णधार कायम असेल, असे सर्वांना वाटत होते. पण त्यानंतर मात्र बऱ्याच गोष्टींची चर्चा सुरु होती. ही चर्चा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत होती. पण आज अखेर मुंबई इंडियन्सने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

मुंबई इंडियन्सने आज एक पत्रक जाहीर केले. या पत्रकात हार्दिक पंड्या हा मुंबईचा कर्णधार असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हार्दिक सध्याच्या घडीला दुखापतग्रस्त आहे आणि तो अजून काही महिने क्रिकेट खेळ शकणार नाही. 

तरीही मुंबई इंडियन्सने लिलावापूर्वी आपला कर्णधार कोण असणार हे त्यांना जाहीर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला गेल्या काही वर्षांत जेकेपद पटकावता आले नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे हार्दिक हा भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार आहे.


हेही वाचा

वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा