उपांत्य फेरीत हरमीतचा पराभव

 Worli
उपांत्य फेरीत हरमीतचा पराभव
Worli, Mumbai  -  

वरळी येथे शनिवारी झालेल्या आयटीटीएफ चॅलेंज टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या हरमीत देसाईला उपांत्य फेरीतील लढतीत पराभव पत्कारावा लागला. एकूण सात गेमच्या लढतीत त्याला 3-4 अशा फरकाने फ्रान्सच्या ट्रिस्ट्रिन फ्लोरेने हरवले. 

वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या इंडियन ओपन स्पर्धेत या फ्रेंच खेळाडूच्या विरोधात त्याने चांगली कामगिरी करत आपली चमक दाखवली होती. अशीच कामगिरी त्याला या सामन्यात दाखवता आली नाही. त्याच्याकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या, पण या अपेक्षांना साजेसा खेळ तो दाखवू शकला नाही. या सामन्यात हरमीतला 11-6, 10-12, 11-8, 8-11, 7-11, 11-6, 8-11 असा पराभव पत्कारावा लागला. जागतिक क्रमवारीत हरमीत याने अव्वल 100 मध्ये स्थान मिळवले आहे.

Loading Comments