SHARE

गेल इंडिया लिमिटेडच्या हिमांशू जैन यानं अापला फाॅर्म कायम राखत इंडियन रेल्वेच्या फैझल खानचा ७-१ असा धुव्वा उडवत माटुंगा जिमखाना ६-रेड अोपन स्नूकर स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केलं. माटुंगा जिमखान्यातर्फे बीएसएएमच्या मान्यतेखाली झालेल्या या स्पर्धेत तेलंगणाच्या हिमांशू जैननं विजेतेपदाची ट्राॅफी अाणि ५० हजार रुपयांचे पारितोषिक पटकावलं. उपविजेत्या फैझल खानला ३० हजार रुपयांच्या पारितोषिकावर समाधान मानावं लागलं. सलामीच्या सामन्यात ७३ गुणांचा ब्रेक लगावणाऱ्या यासिन मर्चंट यांना सर्वाधिक ब्रेकपाँइंट लगावल्याप्रकरणी ५ हजार रुपयांचे इनाम देण्यात अालं.


हिमाशू जैन यानं चेंडूवर अचूक नियंत्रण राखत प्रतिस्पर्ध्याला कमबॅक करण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या बाजूला फैझल मात्र लय मिळवण्यासाठी धडपडत होता. गुण मिळवण्याच्या अनेक संधी फैझलला चालून अाल्या होत्या, मात्र त्याचे सोनं करण्यात त्याला अपयश अालं.

सातत्यपूर्ण खेळ करत हिमांशूनं पहिल्या सहा फ्रेम जिंकत ६० अशी भक्कम अाघाडी घेतली होती. अखेर सातव्या फ्रेममध्ये फैझलनं खातं खोललं. मात्र त्यानंतर पुढील फ्रेम जिंकून हिमांशूनं विजेतेपदावर नाव कोरलं. त्यानं हा सामना ३४-२३, ४३-११, ४१-३३, ४२-०, ४१-०, ४३-३२, १८-३२, ४०-३० असा जिंकला.


हेही वाचा -

माटुंगा जिमखाना स्नूकर स्पर्धेत अवनिश शहाची विजयी घोडदौड

संबंधित विषय
ताज्या बातम्या