Advertisement

मुंबईत रंगणार अांतरशालेय सांघिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप


मुंबईत रंगणार अांतरशालेय सांघिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप
SHARES

मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांना या अापल्यात बुद्धीचातुर्य दाखविण्याची संधी मिळणार अाहे. येत्या २५ अाणि २६ अाॅगस्ट रोजी कफ परेड येथील जी. डी. सोमानी शाळेत अायअायएफएल मुंबई अांतरशालेय टीम चेस चॅम्पियनशिपचे अायोजन करण्यात अाले अाहे. दोन दिवस रंगणारी ही स्पर्धा शालेय मुलांसाठी मुंबईतील सर्वात मोठी बुद्धिबळ स्पर्धा समजली जात अाहे. अकॅडमी अाॅफ चेस ट्रेनिंग (एसीटी) तसेच एसएमसीए अाणि अायसीएसच्या विद्यमाने अाणि मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनच्या अधिपत्याखाली (एमसीडीसीए) ही स्पर्धा अायोजित करण्यात अाली अाहे.


४०० विद्यार्थ्यांचा सहभाग

या मेगा स्पर्धेत शहरातील विविध शाळांमधून ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असण्याची अपेक्षा अाहे. अधिक माहितीसाठी अाणि प्रवेशासाठी www.smca64.com येथे संपर्क साधावा. बुद्धिबळामुळे लहान मुलांची बुद्धी विकसित होत जाते. त्याचबरोबर सांघिक स्पर्धेमुळे मुलांना एकत्रितपणे निर्णय घेण्याचे तसेच एकमेकांना पाठिंबा देण्याचे तंत्र अात्मसात करता येते. या स्पर्धेमुळे त्यांचे कौशल्य अाणि खेळ सुधारेल, अशी अाशा एसएमसीएचे सीईअो नागेश गुत्ताला यांनी व्यक्त केली.



सांघिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये फक्त एकता निर्माण होत नसून एकमेकांशी चांगले नातेही निर्माण होते. अायअायएफएल मुंबई अांतरशालेय सांघिक बुद्धिबळ स्पर्धेद्वारे मुलांना अापल्यातील कौशल्य दाखविण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळणार नसून अापल्यातील खिलाडीवृत्तीचे प्रदर्शन करण्याची तसेच एकमेकांसोबत काम करण्याची संधीही मिळणार अाहे.
- प्रफुल झवेरी, मुख्य अायोजक


हेही वाचा -

अागरकरला दिलासा, हकालपट्टीची याचिका एमसीएने फेटाळली

मुंबईकर अभिषेक नायर पुद्दुचेरीकडून खेळणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा