Advertisement

१२ अव्वल महिला बुद्धिबळपटू विजेतेपदासाठी लढणार

भारताची भिस्त महिला अांतरराष्ट्रीय मास्टर अाकांक्षा हगवणे (एलो २२९७), महिला अांतरराष्ट्रीय मास्टर जी. के. मोनिषा (२२९५), महिला अांतरराष्ट्रीय मास्टर वंतिका अग्रवाल (२२७९) अाणि महिला अांतरराष्ट्रीय मास्टर श्रीजा शेषाद्री (२२०७) यांच्यावर असणार अाहे. महिला फिडे मास्टर दिव्या देशमुख (२१३८) तसेच १२ वर्षांखालील जागतिक विजेती अाणि माजी अाशियाई चॅम्पियन रक्षिता रावी (२०६७) या भारताच्या दोन उभरत्या खेळाडूंना या स्पर्धेत संधी देण्यात अाली अाहे.

१२ अव्वल महिला बुद्धिबळपटू विजेतेपदासाठी लढणार
SHARES

मोंगोलियाची अांतरराष्ट्रीय मास्टर मुंगूनटूल बाखूयाग (एलो रेटिंग २४१०) अाणि बेल्जियमची अांतरराष्ट्रीय मास्टर अॅना झोझूलिया (एलो २३१४) या एसबीअाय लाइफ-एअायसीएफ महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात अाहेत. इंडियन चेस स्कूल अाणि दक्षिण मुंबई चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानं चेंबूर येथील द एकर्स क्लबवर मंगळवार १२ जूनपासून ही स्पर्धा रंगणार अाहे.

७.५० लाखांची बक्षिसं

एअायसीएफने निवड केलेल्या १२ महिला बुद्धिबळपटू (सहा भारतीय अाणि सहा परदेशी) या स्पर्धेत विजेतेपदासाठी एकमेकांशी झुंजतील. एकूण ७.५० लाख रुपयांची (११,००० अमेरिकन डाॅलर) बक्षिसे दिली जाणाऱ्या या स्पर्धेतील विजेता १.६० लाख रुपयांचा मानकरी ठरणार अाहे.

या परदेशी खेळाडूंचा सहभाग

उझबेकिस्तानची महिला ग्रँडमास्टर तोखीरजोनोव्हा गुलरुखबेगिम (एलो २३७९), व्हिएतनामची महिला ग्रँडमास्टर वो थी किम फुंग (एलो २३७६) अाणि कझाकस्तानची महिला अांतरराष्ट्रीय मास्टर नाखबायेव्हा गुलिश्कन (एलो २३२३) त्याचबरोबर रशियाची महिला अांतरराष्ट्रीय मास्टर तोमिलोव्हा एलेना (एलो २३३४) या परदेशी खेळाडू विजेतेपदाच्या शर्यतीत असणार अाहेत.

यांच्यावर भारताची भिस्त

भारताची भिस्त महिला अांतरराष्ट्रीय मास्टर अाकांक्षा हगवणे (एलो २२९७), महिला अांतरराष्ट्रीय मास्टर जी. के. मोनिषा (२२९५), महिला अांतरराष्ट्रीय मास्टर वंतिका अग्रवाल (२२७९) अाणि महिला अांतरराष्ट्रीय मास्टर श्रीजा शेषाद्री (२२०७) यांच्यावर असणार अाहे. महिला फिडे मास्टर दिव्या देशमुख (२१३८) तसेच १२ वर्षांखालील जागतिक विजेती अाणि माजी अाशियाई चॅम्पियन रक्षिता रावी (२०६७) या भारताच्या दोन उभरत्या खेळाडूंना या स्पर्धेत संधी देण्यात अाली अाहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा