इन्कम टॅक्सने स्प्रिंगफिल्डला 3-2 ने दिली मात

 Parel
इन्कम टॅक्सने स्प्रिंगफिल्डला 3-2 ने दिली मात

मुंबई जिल्हा असोसिएशन फुटबॉल स्पर्धेत इन्कम टॅक्स संघाने स्प्रिंगफिल्ड एससी संघाला 3-2ने मात दिलाी. परळच्या झेवियर्स मैदानात सोमवारी हा सामना रंगला. इन्कम टॅक्स संघातील आघाडीच्या फळीतील खेळाडू प्रथमेश पोरवालने पहिला गोल दुसऱ्या मिनिटाला, तर दुसरा गोल 89 व्या मिनिटाला नोंदवला आणि याच संघातील पवन रावत याने 69 व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. तर स्प्रिंगफिल्ड मधील अक्षय शेट्टीने 72 व्या मिनिटाला आणि जबिन पिल्लईने 81 व्या मिनिटाला गोल नोंदवले.

Loading Comments