रोहितला अजून एक संधी

  Churchgate
  रोहितला अजून एक संधी
  मुंबई  -  

  मुंबई : न्यूझीलंडविरुद्ध होणा-या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मुंबईकर रोहित शर्माला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र वेस्ट इंडिज दौ-यासाठी भारतीय संघात समावेश असलेला अन्य मुंबईकर शार्दुल ठाकूर याला मात्र संघात संधी मिळू शकलेली नाही.

   भारतीय संघ सप्टेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने सोमवारी मुंबईत भारतीय संघाची घोषणा केली. या मालिकेसाठी निवडलेला संघ पुढीलप्रमाणे. 
  भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, शिखर धवन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, चेतेश्वर पुजारा, के. एल. राहुल, वृद्धिमान साहा, इशांत शर्मा, रोहित शर्मा, मुरली विजय, उमेश यादव. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.