Advertisement

India vs Pakistan Match Date : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख बदलण्याची शक्यता

अहमदाबादमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव तारीख बदलण्याची शक्यता आहे.

India vs Pakistan Match Date : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख बदलण्याची शक्यता
SHARES

भारत पाकिस्तान वर्ल्ड कप (Match) सामन्याची (India pakistan world cup) तारीख बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टीम इंडिया 15 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) द्वारे याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. परंतु या तारखेत बदल होऊ शकतो. 

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख बदलली जाऊ शकते. कारण 15 ऑक्टोबर हा ‘नवरात्रीचा’ पहिला दिवस आहे. विशेषत: गुजरातमध्ये गरबा जोमात साजरा केला जातो. 

अहवालात असे म्हटले आहे की सुरक्षेच्या कारणास्तव एजन्सींनी बीसीसीआयला खेळ पुन्हा शेड्यूल करण्याचा सल्ला दिला आहे. “आम्ही आमच्याकडे असलेल्या पर्यायांवर विचार करत आहोत आणि लवकरच निर्णय घेतला जाईल. आम्हाला सुरक्षा एजन्सींकडून सांगण्यात आले आहे की भारत विरुद्ध पाकिस्तान सारखा हाय-प्रोफाइल गेम, ज्यासाठी हजारो प्रवासी चाहते अहमदाबादला पोहोचतील अशी अपेक्षा आहे. यामुळे सुरक्षा व्यवस्थेवरील ताण वाढण्याची शक्यता आहे,” असे एका सूत्राने इंडियन एक्सप्रेसला सांगितले. .

भारत-पाकिस्तान मॅचसाठी अनेक चाहत्यांनी मॅच तिकिट, फ्लाईट तिकिट, हॉटेल बुकिंग आधीच बुक केले आहे. जर तारीख बदलली तर अनेक समस्यांचा सामना चाहत्यांना करावा लागू शकतो. 

अशाप्रकारे, पुनर्नियोजन झाल्यास हॉटेल बुकिंग मोठ्या प्रमाणात रद्द होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेला  दोन महिन्यांहून अधिक कालावधी बाकी असताना, तिकीट विक्रीबाबत कोणतेही अपडेट नाही, त्यामुळे चाहत्यांची निराशा वाढली आहे. 

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात असेही म्हटले आहे की बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सर्व होस्टिंग ठिकाणांच्या सदस्यांना 27 जुलै (गुरुवार) रोजी नवी दिल्ली येथे बैठकीसाठी एकत्र येण्यास सांगितले आहे, जिथे भारत-पाकिस्तान मॅचवर निर्णय घेतला जाऊ शकतो.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबर रोजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यासह विश्वचषक स्पर्धेतील चार गटांचे सामने होणार आहेत.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा