Advertisement

मुंबईत पहिल्यांदाच रंगणार आयजीएलचा थरार


मुंबईत पहिल्यांदाच रंगणार आयजीएलचा थरार
SHARES

भारतात सध्या क्रिकेट आयपीएल पाठोपाठ प्रत्येक खेळात लीग पद्धत सुरू झाली आहे. यामुळे खेळाला प्रोत्साहन तर मिळतेच, शिवाय खेळाडू देखील घडतात. याच कारणामुळे ऑलिम्पिकमध्ये महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिम्नॅस्टिक या खेळाचे लीग प्रथमच मुंबईत सुरू करण्यात आले आहे. यामुळे अॅथलेट्सना याचा चांगलाच फायदा होईल, यात शंका नाही. 


स्पर्धा कुठे रंगणार?

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत भारतातील अव्वल आंतरराष्ट्रीय, तसेच राष्ट्रीय स्पर्धक देखील यात सहभागी होणार आहेत. त्यांच्यासाठी प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे जेवणाची आणि राहण्याची मोफत व्यवस्था करण्यात येईल.

या स्पर्धेत ट्विस्टर, बाऊन्सर, स्विंगर्स आणि संपर्स असे एकूण चार संघ असतील. प्रत्येक संघात आठ खेळाडूंचा समावेश असणार आहे. यामधील प्रत्येक संघात ज्युनियर आणि सीनिअर पुरूष-महिला खेळाडूंचा समावेश असेल. ही स्पर्धा येत्या १ ते ३ डिसेंबर दरम्यान संध्याकाळी ५ ते ९ यावेळेत विलेपार्ले येथील प्रबोधनकार क्रीडा संकुल येथे खेळवण्यात येईल. विशेष म्हणजे या स्पर्धेतील विजेत्या संघाला १ लाखांचं, तर उपविजेत्या संघाला ५० हजारांचे बक्षिस दिले जाईल.


उत्कृष्ट खेळाडूंना अंतिम सामन्यात प्रवेश

या स्पर्धेत पराभूत संघातील उत्कृष्ट खेळाडूला अतिंम सामन्यात खेळण्याची देखील संधी मिळणार आहे. स्पर्धेच्या रिस्की रिपीट या नव्या नियमानुसार पहिल्या दोन पराभूत संघातील एक-एक उत्कृष्ट खेळाडूची निवड अंतिम सामन्यातील दोन संघांसाठी करण्यात येईल. यामुळे उत्कृष्ट खेळाडूला यातून अंतिम सामना खेळण्याची संधी मिळेल.अभिनेता टायगर श्रॉफ हा देखील जिम्नॅस्टिकचा खेळाडू आहे. याबद्दल त्याने देखील आनंद व्यक्त केला आहे. 'ही सर्वात मोठी जिम्नॅस्टिक स्पर्धा असेल. भारतातील सर्वात अव्वल दर्जाचे खेळाडू यात सहभागी होणार आहेत. तरी तुम्हीदेखील या आणि खेळाडूंना सपोर्ट करा' असे आवाहन टायगरने केले आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा