Advertisement

न्यूझीलंडच्या मिचेल मॅक्लेघनला हवंय 'ठंडा पानी'!

मुंबईकर रोहित शर्मानं मिचेलला हिंदी माहिती आहे का हे तपासण्यासाठी त्याला थेटच विचारलं. आता न्यूझीलंडचा क्रिकेटर म्हणजे तो चिवट असणारच! मग मिचेल तरी कसला सोडतोय?

न्यूझीलंडच्या मिचेल मॅक्लेघनला हवंय 'ठंडा पानी'!
SHARES

सध्या सगळीकडे चर्चा आहे ती आगामी भारत विरूद्ध न्यूझीलंड वनडे आणि टी-20 सिरीजची! सिरीज सुरु व्हायला अवघा काही दिवसांचा अवधी शिल्लक असल्यामुळे दोन्ही टीम जोरदार तयारीला लागल्या आहेत. विशेषत: न्यूझीलंड. पण क्रिकेटच्या सरावासोबतच न्यूझीलंडमध्ये काही खेळाडू हिंदी शिकण्याचा सराव करत आहेत. 

न्यूझीलंडचा फास्ट बॉलर मिचेल मॅक्लेघनने तर चक्क भारताचा ओपनिंग बॅट्समन रोहित शर्माकडे हिंदी शिकण्याचा क्लासच लावला आहे! अहो खरं तेच सांगतोय आम्ही! रोहितने स्वत: याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. आणि विशेष म्हणजे मॅक्लेघन या व्हिडिओमध्ये हिंदी बोलूही शकला आहे.



'ठंडा पानी' आणि 'नहीं नहीं नहीं नहीं'!

त्याचं झालं असं की मुंबईकर रोहित शर्मानं मिचेलला हिंदी माहिती आहे का हे तपासण्यासाठी त्याला थेटच विचारलं. आता न्यूझीलंडचा क्रिकेटर म्हणजे तो चिवट असणारच! मग मिचेल तरी कसला सोडतोय? त्यानेही त्याला माहित असलेले काही हिंदी शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. पण प्रयत्न करुनही मिचेलची गाडी 'ठंडा पानी' आणि 'नहीं नहीं नहीं नहीं'पर्यंतच अडकली.

त्याची गाडी अडकली असली, तरी त्यानं केलेल्या प्रयत्नाला रोहित शर्मानं दाद दिली. याआधीही काही परदेशी खेळाडूंनी हिंदी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रेट ली, ख्रिस गेल अशी काही नावं या यादीमध्ये घेता येतील. आयपीएलमुळे तर या परदेशी खेळाडूंना भारतीय खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करायला मिळते. त्यामुळे हिंदीचा प्रभाव तर होणारच!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा