मुलींसाठी आंतरशालेय रबर बॉल क्रिकेट स्पर्धा


  • मुलींसाठी आंतरशालेय रबर बॉल क्रिकेट स्पर्धा
  • मुलींसाठी आंतरशालेय रबर बॉल क्रिकेट स्पर्धा
  • मुलींसाठी आंतरशालेय रबर बॉल क्रिकेट स्पर्धा
SHARE

डोंगरी - डोंगरी महापालिका शाळेतील क्रिडांगणात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. महानगरपालिका आणि सलाम बॉम्बे फाउंडेशन सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. 2008 पासून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेत संपूर्ण मुंबईतील पालिका शाळेत शिकणाऱ्या 11 ते 15 वयोगटातील15 संघाने भाग घेतला होता. बुधवारी झालेल्या सामन्यात अभ्युदयनगर म्युनिसिपल स्कुल, करीरोड आणि मेघराज शेट्टी म्युनिसिपल शाळेतील मुलांनी उपांत्य फेरीत धडक मारली असून येत्या शनिवारी या दोन संघात अंतिम सामना रंगणार आहे.

तर, पालिका आणि सामाजिक संस्था सलाम बॉम्बे फाउंडेशनने मुलींकरिता एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे. याचा फायदा आम्हाला भविष्यात होणार आहे. या स्पर्धेत आम्हाला शिकायला आणि खेळायलाही मिळालं असं कर्णधार तनिषा खान हिनं म्हटलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या