मुंबई..दि तैवान एक्सलन्ट !


  • मुंबई..दि तैवान एक्सलन्ट !
SHARE

मुंबई - 'दि तैवान एक्सेलन्स' गेमिंग कप 2016 च्या विजेतेपदाचा मान मुंबईतील इन्विजिबल विंग्स संघाला मिळाला आहे. विजेत्या संघाला चषक आणि 2 लाख रुपये रोख पोरितोषिक देण्यात आले आहे. उपविजेत्या ठरलेल्या बियॉन्ड इन्फिनिटी संघाला 80 हजार रुपये रोख तर तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला 40 हजार रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

यावर्षी 'दि तैवान एक्सेलन्स' गेमिंग कपमध्ये प्रथमच कॉस्प्ले ही नवीन संकल्पना राबवण्यात आली. कॉस्प्लेमध्ये खेळाडूंना 'कॉस्च्युम प्ले' म्हणजेच गेम खेळताना त्यातील अॅनिमेशन पात्रांसारखा पेहेराव करावा लागला.

'दि तैवान एक्सेलन्स' या स्पर्धेचे आयोजन ब्युरो ऑफ फॉरेन ट्रेंडतर्फे करण्यात आले होते. त्याचे व्यवस्थापन TAITRA करण्यात आले. यामध्ये एकूण 378 संघानी सहभाग घेतला होता. त्यापैकी एकूण 12 संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या