कबड्डीत जागृती स्पोर्ट्स क्लबनं मारली बाजी


  • कबड्डीत जागृती स्पोर्ट्स क्लबनं मारली बाजी
  • कबड्डीत जागृती स्पोर्ट्स क्लबनं मारली बाजी
SHARE

प्रभादेवी - आगरी सेवा संघ आयोजित पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेत जागृती स्पोर्ट्स क्लब संघानं विहंग क्रीडा मंडळाचा 9-4 ने पराभव करत विजयी सलामी दिली. तर जाखमाता आणि ओम ज्ञानदीप या संघांनीही विजयीकूच केली.

प्रभादेवी येथील राजाभाऊ साळवी क्रीडानगरीत सोमवारी झालेल्या कबड्डी स्पर्धेत विहंगनं तुफान सुरुवात करत आपली पकड मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. कैलास आम्रे आणि सर्वेश लाड यांनी जागृती संघाकडून जबरदस्त खेळ करताना विहंगला जोरदार प्रत्युत्तर दिलं. तर, शैलेश आणि योगेश यांचा आक्रमक खेळ विहंगसाठी आत्मविश्वास देणारा ठरला. मध्यंतराला विहंगने वर्चस्व राखल्यानंतर जागृती संघानं पुनरागमन करत बरोबरी साधली.
अखेरच्या मिनिटामध्ये विजयाची संधी असूनही जागृती संघानं बचावात्मक पवित्रा घेतल्यानं सामना बरोबरीत सुटला आणि त्यानंतर प्रत्येकी पाच चढायांचा खेळ रंगला. यामध्ये जागृतीच्या आक्रमकांनी संधी मिळताच खेळ उंचावताना शानदार बाजी मारली.
दुसरीकडे, ओम ज्ञानदीप संघाने तुफान खेळ करताना साई के दिवाने संघाला 41-11 असं लोळवत विजयी सलामी दिली. तर, अमित कुळ्ये आणि रोशन धनावडे यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर जाखमाता संघानं अमर संदेश संघाची 41-24 असा धुव्वा उडवला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या