Advertisement

जलतरण स्पर्धेत जीत-अनन्याची सुवर्ण कामगिरी


जलतरण स्पर्धेत जीत-अनन्याची सुवर्ण कामगिरी
SHARES

जीएएफ-ग्रेटर मुंबई अॅमॅच्युअर अॅक्वाटिक जलतरण स्पर्धेत मुलुंड स्विमिंग पूल क्लबच्या जीत पाटील आणि गोरेगाव ओझोन क्लबच्या अनन्या नायक यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.


वैयक्तिक गटातही मारली बाजी

जीएएफ-ग्रेटर मुंबई अॅमॅच्युअर अॅक्वाटिक असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा धारावी स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे खेळवण्यात आली. या दोघांनी स्विमिंगच्या फ्री स्टाईल, ब्रेस्ट स्ट्रोक आणि बटरफ्लया या 50 मीटरमधील प्रकारात विजय मिळवला. याचबरोबर दोघांनी वैयक्तिक गटात देखील 100 मीटर प्रकारत बाजी मारत पदक मिळवले. 8 वर्षाखालील मुले आणि मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक संघाच्या सिया देवरुखकर हिने चार सुवर्ण पदक मिळवले.


अर्चित मोरवेकरची देखील सुवर्ण कामगिरी

महाराष्ट्र लेबर वेल्फेअर बोर्डच्या अर्चित मोरवेकर यानेदेखील तीन सुवर्ण पदक आणि 50 मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. याचदरम्यान झालेल्या 7 वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत अंधेरी सेलिब्रेशन क्लबच्या श्रय भल्ला याने 50 मीटरमधील बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक आणि फ्री स्टाईलमध्ये सुंदर कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर बटरफ्लाय प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा