शौर्यच्या चमकदार कामगिरीमुळे जेव्हीपीजीसीचा विजय

 Juhu
शौर्यच्या चमकदार कामगिरीमुळे जेव्हीपीजीसीचा विजय

जुहू-विलेपार्ले जिमखाना आयोजित एमएसडीटीटी इंटर क्लब प्रीमियर डिव्हीजन लीगमध्ये बुधवारी जुहू विलेपार्ले जिमखान्याच्या अ संघातील शौर्य पेडणेकरने खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवत विजय मिळवला. टेबल टेनिसमध्ये शौर्य राज्यात क्रमांक 1 वर असून त्याच्या खेळाने चाहते खूश झाले.

साने गुरुजी अॅकॅडमीने माजी चॅम्पियन अंदेरी वायएमसीएचा 3-0 अशा फरकाने धुव्वा उडविला आणि चार संघांच्या डिव्हिजन लीगमध्ये उपविजेतेपद पटकावले. साने गुरुजींच्या जिग्नेश राहातवाल, पुनीत देसाई आणि रित्वीक नागळे यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी करत संघाला विजयी केले.

परुष विभागातील जुहू-पार्ले जिम 'अ' विरुध्द जुहूपार्ले जिम 'क' या संघात झालेल्या चुरशीच्या सामन्यात जुहू पार्ले जिम 'अ' संघाने 3-1 ने विजय मिळवला. 'अ' संघाच्या शौर्य पेडणेकर, देव श्रॉफ आणि मानव मेहता यांनी चमकदार कामगिरी केली.

Loading Comments