Advertisement

आयडियल सुपर लीग कॅरम स्पर्धेत केजे फायटर्स अजिंक्य


आयडियल सुपर लीग कॅरम स्पर्धेत केजे फायटर्स अजिंक्य
SHARES

शालेय मुलांच्या आयडियल सुपर लीग कॅरम स्पर्धेत चेंबूरनाका महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी गणेश चव्हाण आणि शहजाद कुरेशी यांच्या अप्रतिम खेळामुळे केजे फायटर्स संघाने अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत केजे फायटर्स संघाने एबी स्लॅमर्स संघाचा २-१ असा पराभव केला. डॉ. अँटोनियो डी'सिल्व्हा शाळेच्या एबी स्लॅमर्स संघातील मुंलांनी जिंकण्यासाठी या स्पर्धेत अपराजित खेळ केला. पण त्यांना अंतिम उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले.

आयडियल स्पोर्ट्स अकॅडेमी आणि स्पोर्ट्स असोसिएशन फॉर स्कूल चिल्ड्रेनतर्फे शालेय मुला-मुलींसाठी मोफत कॅरम उपक्रम २६ जूनपासून सुरू करण्यात आला. त्यामध्ये कॅरम सम्राट सुहास कांबळी, महेंद्र तांबे, शशिकांत कोंडकर, प्रणेश पवार यांच्यासह विख्यात कॅरमपटू आणि पंच यांनी शेकडो शाळकरी मुलांना नियम आणि सराव मार्गदर्शन विनाशुल्क करून त्यांचा दर्जा वाढवण्याचा उत्तम प्रयत्न केला. स्पर्धात्मक सरावाचा भाग म्हणून झालेल्या या आयडियल सुपर लीग कॅरम स्पर्धेचे उपांत्य उपविजेते जीएम बटर्स आणि केए स्टार्टर्स संघ ठरले.

माजी क्रिकेटपटू अनंत भालेकर, क्रीडापटू सचिन आयरे, डॉ. ओमप्रकाश जोशी, डॉ. जितेंद्र लिंबकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी दिवाळीच्या सुट्टीत शालेय मुलांची मुंबई सुपर लीग कॅरम स्पर्धा होणार असल्याचे आयडियल स्पोर्ट्स अकॅडेमीचे अध्यक्ष लीलाधर चव्हाण यांनी सांगितले.



हेही वाचा - 

महाविद्यालयीन चेस, कॅरम स्पर्धेत १५२ विद्यार्थ्यांचा सहभाग

कॅरम स्पर्धेत वरळी संघाची दादरवर मात


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा