Advertisement

कॅरम स्पर्धेत वरळी संघाची दादरवर मात


कॅरम स्पर्धेत वरळी संघाची दादरवर मात
SHARES

विश्वाचा राजा चषक या शालेय मुलांच्या 16 वर्षाखालील कॅरम स्पर्धेत मिहीर शेखने बाजी मारली. वरळीच्या 11 वर्षीय मिहीर शेखने अंतिम फेरीत दादरच्या प्रफुल्ल सुर्वेचे आव्हान 2-0 असे सहज संपुष्टात आणले. प्रफुल्ल सुर्वेला यश मिळवता न आल्याने अंतिम सामन्यात त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

ही स्पर्धा दादर पश्चिम येथील ओमकार बालमित्र गणेशोत्सव मंडळ आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत मिहीर शेखने पहिलाच गेम नील देत प्रफुल्ल सुर्वेवर दबाव आणला. दुसऱ्या गेममध्ये देखील मिहीरचा आक्रमक खेळ सुरूच राहिला. प्रफुल्ल सुर्वेने सावरण्याचा प्रयत्न करूनही अखेर 25-0, 25-9 अशा फरकाने पराभव पत्करला. स्पर्धेतील उपांत्य उपविजेते शुभम घागरे आणि जिग्नेश परमार हे दोघेही पुरस्काराचे मानकरी ठरले.

शालेय मुलांना डीएसओ कॅरम स्पर्धेची पूर्व तयारी म्हणून आयडियल स्पोर्ट्स अकॅडेमी आणि स्पोर्ट्स असोसिएशन फॉर इंडियन स्कूल चिल्ड्रेनतर्फे मुंबईत विविध ठिकाणी जूनपासून सराव आणि स्पर्धात्मक खेळाचा मोफत उपक्रम चॅम्पियन कॅरम बोर्डवर राबवला जात आहे. चेंबूरनाका पालिका शाळा, अवर लेडी स्कूल-सायन, डॉ. अँटोनियो डिसिल्वा हायस्कूल-दादर या शाळेतील मुलांनी कॅरम उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला.



हे देखील वाचा - 

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत संदीप दिवे, आयेशा मोहम्मद विजयी

मुंबईचा पंकज कॅरम स्पर्धेत विजयी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा