जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत संदीप दिवे, आयेशा मोहम्मद विजयी

  Juhu
  जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत संदीप दिवे, आयेशा मोहम्मद विजयी
  मुंबई  -  

  दुसऱ्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात पुरुष एकेरी गटात मुंबई उपनगरचा संदीप दिवे तर, महिला एकेरी गटात आयेशा मोहम्मदने विजय मिळवला. जुहू विलेपार्ले जिमखाना क्लबतर्फे आयोजित केलेली ही स्पर्धा जुहूमध्ये पार पडली.

  पुरुषांच्या अंतिम फेरीत संदीप दिवे विरुद्ध गिरीश तांबे यांच्यात चुरशीची लढत झाली. पाहिल्या सेटमध्ये संदीपने 25-8 अशी आघाडी घेतली. यावेळी गिरीशला संदीपच्या आव्हानासमोर नमते घ्यावे लागले. दुसऱ्या सेटमध्ये 7-11 तर तिसऱ्या फेरीत संदीपने 23-14 अशा फरकाने सामना आपल्या खिशात घातला.

  महिलांच्या एकेरी गटातील अंतिम फेरीत अनुभवी असलेल्या आयेशासमोर काजल कुमारीलाही आपले नशीब आजमावता आले नाही. आयेशाने पहिल्या आणि दुसऱ्या सेटमध्येच 25-2 आणि 22-7 अशा मोठ्या फरकाने आघाडी घेतली. मात्र तिसऱ्या सेटमध्ये काजल कुमारीला मात देत आयेशाने विजय मिळवला. यावेळी पुरुष गटात गिरीश तांबे उपविजेता ठरला तर, महिला गटात काजल कुमारीला उपविजेतेपदावर समाधानी व्हावे लागले.




  हेही वाचा

  मुंबईचा पंकज कॅरम स्पर्धेत विजयी


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.