पवई आयआयटीच्या मुलींचा दमदार विजय

  Pali Hill
  पवई आयआयटीच्या मुलींचा दमदार विजय
  मुंबई  -  

  मुंबई - पवई आयआयटी विरूद्ध के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या मुलींमध्ये शनिवारी हॉलिबॉलचा अंतिम सामना रंगला. के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या मुली होम ग्राऊंडवर खेळत असल्याने त्यांना हरवणं पवई आयआयटी संघाच्या मुलींसमोर आव्हान होते. मात्र हे तगडे आव्हान पेलत पवई आयआयटीनं के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या मुलींना त्यांच्या होम ग्राऊंडवर हरवले.

  होम ग्राऊंडवर मॅच असल्याने साहजिक प्रेक्षकांची साथ ही सोमय्याच्या मुलींना होती. मात्र पहिल्या फेरीत 25-21 पॉईंट आणि दुसऱ्या फेरीत 25-12 पॉईंट मिळवत आयआयटी पवईने सोमय्याच्या टीमला त्यांच्यात घरच्या मैदानात धुळ चारली.

  Loading Comments
  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.