Advertisement

अंधेरीत कबड्डी स्पर्धा संपन्न


 अंधेरीत कबड्डी स्पर्धा संपन्न
SHARES

अंधेरी - आधार सेवा प्रतिष्ठानच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धा सोमवारी झाली. भाजपच्यावतीनं या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या द्वितीय श्रेणी गटात गोरेगावचा जागर स्पोर्ट विजेता तर गोरेगावचाच आरे भास्कर संघ हा उपविजेता ठरलाय. महिलागटात गोरेगावचा संघर्ष क्रिडा मंडळ विजेता तर महात्मा गांधी स्पोर्टस् (बोरिवली) हा संघ उपविजेता ठरला. प्रथम श्रेणी गटात- ओमसाई क्रिडा मंडळ (बोरिवली) विजेता तर भांडूपचा उत्कर्ष क्रिडा मंडळ संघ उपविजेता ठरलाय. सर्व विजेत्या संघाना आमदार अमित साटम यांच्याहस्ते चषक,रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष-उत्तर-पश्चिम विठ्ठल बंधेरी, महिला सेक्रेटरी उत्तर-पश्चिम- सिल्मा परब, विकासक - विजय ठक्कर, नंदू महसूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा