व्यवसायिक राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धा

 Lower Parel
व्यवसायिक राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धा

लोअर परळ - यंग विजय क्रीडा मंडळ आयोजित सार्थ प्रतिष्ठानतर्फे व्यसायिक राज्य स्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धा मॅटवर खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा 9 ते 12 डिसेंबर या कालावधीत लोअर परळच्या फिनिक्स मॉलशेजारी असलेल्या पार्गिक मैदानात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील अंतिम विजयी संघास रोख 75 हजार रुपये आणि चषक तर उपविजयी संघास रोख 50 हजार रुपये आणि चषक, तर उपांत्य-उपविजयी या दोन्ही संघास 15 हजार आणि चषक दिली जाणार आहे. व्यवसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पहिल्यांदाच लोअर परळ विभागात होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading Comments