अभ्युदय एज्युकेशनने पटकावले उपविजेतेपद

 Abhyudaya Nagar
अभ्युदय एज्युकेशनने पटकावले उपविजेतेपद

काळाचौकी - मुंबई जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत अभ्युदय एज्युकेशन शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सुयश संपादन केले आहे. धारावी येथील क्रीडा संकुलनात गुरुवार ही स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेत मुलांच्या 17 वर्ष वयोगाटात 80 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अभ्युदय एज्युकेशन शाळेच्या विद्यार्थ्यांनी उपविजेतेपद पटकावले. तर मुलींच्या 14 वर्ष वयोगटात 36 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अभ्युदय एज्युकेशनच्या विद्यार्थिनींनी उपविजेतेपद पटकावले अशी माहिती क्रीडा शिक्षक समाधान डोंगरे, स्मिता मिसाळ, चंद्रभान लांडे यांनी दिली. यावेळी प्राचार्य आर. बी पाटील, अभ्युदय एज्यूकेशन सोसायटीचे सचिव हरीश शेट्टी उपस्थित होते.

Loading Comments