Advertisement

कबड्डीपटू सायली जाधवला मिळणार शासकीय नोकरी


कबड्डीपटू सायली जाधवला मिळणार शासकीय नोकरी
SHARES

नुकत्याच झालेल्या अाशियाई कबड्डी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणारी मुंबई उपनगरच्या सायली जाधव हिला शासकीय नोकरी देण्याचं अाश्वासन शुक्रवारी क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दिलं. भारतीय संघाची कर्णधार अभिलाषा म्हात्रे अाणि सायली जाधव यांचा अाज मंत्रालयात सत्कार करण्यात अाला. या दोघींना सात लाख रुपयांचा धनादेश देऊन तावडे यांच्या हस्ते गौरवण्यात अाले.


मुंबई उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लबकडून खेळणारी अाणि वांद्रे येथे राहणारी सायली जाधव अाता राज्य सरकारच्या सेवेत क्लास-२ अधिकारी म्हणून रुजू होणार अाहे. मात्र त्यासाठी तिला अापला पदवी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार अाहे. 


शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मला क्लास-२ अधिकारी म्हणून सेवेत घेण्याचं अाश्वासन दिलं अाहे. मी सध्या बँकिंग अाणि इन्श्यूरन्स पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत अाहे. ग्रॅज्यूएट झाल्यानंतर मला नोकरी दिली जाईल.
- सायली जाधव, कबड्डीपटू

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा