Advertisement

अव्वल मानांकित पंकज अडवाणीला पराभवाचा धक्का


अव्वल मानांकित पंकज अडवाणीला पराभवाचा धक्का
SHARES

चर्चगेट येथील क्रिकेट क्लब अाॅफ इंडियाच्या (सीसीअाय) विल्सन जोन्स बिलियर्ड्स रूममध्ये सुरू असलेल्या सीसीअाय अखिल भारतीय अोपन स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेत अव्वल मानांकित अाणि विश्वविजेत्या पंकज अडवाणीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. ब्रिटन अाणि युरोपमधील व्यावसायिक स्पर्धेत खेळणाऱ्या दुसऱ्या मानांकित अादित्य मेहताने मात्र दोन वेळा अाशियाई स्नूकर चॅम्पियन ठरलेल्या यासिन मर्चंटकडून पराभव टाळला. अादित्यने मर्चंटविरुद्ध ५-४ असा निसटता विजय मिळवला.


कमल चावलाकडून अडवाणीचे पॅकअप

इंडियन रेल्वेच्या कमल चावलाने सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करत अनेक जागतिक जेतेपदे जिंकणाऱ्या अडवाणीला घरचा रस्ता दाखवला. बेस्ट अाॅफ ९ फ्रेमच्या या स्पर्धेत कमल चावलाने अडवाणीवर ५-२ असा सहज मिळवत जेतेपदाच्या मार्गातील प्रमुख अडसर दूर केला. जेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या अडवाणीला चावलाची घोडदौड रोखता अाली नाही.


राष्ट्रीय विजेता सुमित तलवारही पराभूत

राष्ट्रीय विजेत्या सुमित तलवार यालाही पीएसपीबीच्या सौरव कोठारी याच्याकडून १-५ असा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. पीएसपीबीच्या मनन चेंद्रा याने सुरेख कामगिरी करत महाराष्ट्राच्या इशप्रीत सिंग चढ्ढा यालाही पराभवाचा धक्का दिला. माजी राष्ट्रीय विजेत्या असलेल्या मननने दुसऱ्या फेरीचा हा सामना ८२-१, ८०-१९, ६६-५४, ३४-६४, ७५-४२ अाणि ६८-६४ असा जिंकला. महाराष्ट्राच्या शाहबाझ खानने पश्चिम बंगालच्या मनीष जैन याला ४-३ असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली अाहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा