Advertisement

कर्नाळ्यात रंगणार नेमबाजीचा थरार


कर्नाळ्यात रंगणार नेमबाजीचा थरार
SHARES

नववर्षात नेमबाजीच्या मोसमाला सुरुवात होणार असून त्याअाधीची रंगीत तालीम म्हणून देशातील अव्वल २० नेमबाज शुक्रवारी पनवेल, नवी मुंबई येथील कर्नाळा स्पोर्टस अकादमीत रंगणाऱ्या अार. अार. लक्ष्य चषक नेमबाजी स्पर्धेत अापले कसब पणाला लावणार अाहेत. निमंत्रितांच्या या नेमबाजी स्पर्धेत दिग्गज नेमबाज अापला जलवा दाखविण्यासाठी सज्ज झाले अाहेत.


हे असतील अाकर्षण

अाॅलिम्पियन नेमबाज अंजली भागवत, सुमा शिरूर, गगन नारंग यांच्यासह विश्वविजेती नेमबाज तेजस्विनी सावंत हे या स्पर्धेत विशेष अाकर्षण असतील. विश्वविक्रमवीर सुमा शिरूर हिने अार. अार. ग्लोबलच्या सहकार्याने अायोजित केलेल्या या स्पर्धेत देशातील अव्वल २० पुरुष अाणि महिला नेमबाज सहभागी होणार अाहेत. त्याचबरोबर ज्युनियर गटात रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या खेळाडूंना संधी दिली जाणार अाहे. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेतील अव्वल अाठ नेमबाजांना या स्पर्धेत स्थान दिले जाईल.


कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीतील जागतिक दर्जाच्या शूटिंग रेंजवर दिग्गज नेमबाजांचा खेळ नवोदित खेळाडूंना पाहता यावा, या उद्देशानेच अाम्ही या वर्षी अव्वल नेमबाजांना या स्पर्धेसाठी निमंत्रित केले अाहे. पूर्वी अाम्हाला सराव करण्यासाठी युरोपला जावे लागत होते. पण अाता युवा खेळाडूंना तोच अनुभव प्रदान करण्यासाठी अाम्ही ही स्पर्धा अायोजित केली अाहे.
- सुमा शिरूर, अाॅलिम्पियन नेमबाज

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा