Advertisement

प्रबोधन मुंबई टी-20 क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकला विजेतेपद


प्रबोधन मुंबई टी-20 क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकला विजेतेपद
SHARES

गोरेगाव मध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधन मुंबई टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात  कर्नाटक स्पोर्टिंगने पय्याडे स्पोर्ट्सचा दणदणीत पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. कर्णधार कौस्तुभ पवार आणि एकनाथ केरकर हे महत्त्वाचे मोहरे चौथ्या षटकादरम्यान 32 धावांवर गमावल्यानंतर कर्नाटकने स्वतःला सावरले आणि 8 बाद 239 अशी आव्हानात्मक धावसंख्या रचण्यात यश मिळवले. कौस्तुभने संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे आपल्या संघाचे नेतृत्व केले त्याची दखलही योग्य प्रकारे घेतली गेली. त्याला “स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू” म्हणून गौरवण्यात आले. तर सलमान सामनावीर ठरला. या विजेत्यांना शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.सलमानने कौस्तुभ आणि एकनाथ बाद झाल्यानंतर मोठ्या संयमाने आणि जबाबदारीने खेळ केला. सलमान अहमद (85) आणि विनायक भोईर (72) यांच्या फटकेबाजीच्या बळावर कर्नाटक संघाने पय्याडे स्पोर्ट्सला 60 धावांनी पराभूत केले.

संक्षिप्त धावफलक - कर्नाटक स्पोर्टिंग – 8 बाद 239 ( सलमान अहमद 85, ओंकार खानविलकर 25, विनायक भोईर 72, हरमीत सिंघ 43/2, पराग खानापूरकर 36/3) वि. वि. पय्याडे स्पोर्ट्स – 9 बाद 179 (पृथ्वी शॉ 21, आदिब उस्मानी 54, आतिफ अत्तरवाला 54, वैभव माळी 38/3, गौरव बेंगरे 32/2) सामनावीर – सलमान अहमद
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू – कौस्तुभ पवार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा