आता लक्ष्य आशियाई चॅम्पियनशिप


  • आता लक्ष्य आशियाई चॅम्पियनशिप
SHARE

चर्चगेट - "यावेळी आशियाई अजिंक्यपद स्पर्धा रांची येथे होणार आहे, त्यामुळे या स्पर्धेवर लक्ष्य केंद्रित करून माझी तायरी सुरू करणार आहे," असे 'सावरपाडा एक्स्प्रेस' कविता राऊत हिने सांगितले. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवणा-या महाराष्ट्रातील खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ती बोलत होती.

यावेळी कवितासोबतच रोईंगपटू दत्तू भोकनाळ यांचा सत्कार करण्यात आला. ललिता बाबर, देवेंद्र वाल्मिकी आणि प्रार्थना ठोंबरे अनुपस्थित असल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी समारंभास उपस्थिती लावली होती. एमसीए येथे पार पडलेल्या या सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वरिष्ठ उपाध्यक्ष वसंत डावखरे ,दिलीप वळसे-पाटील, धनराज पिल्ले, कोषाध्यक्ष हेमंत टकले, पार्थ पवार, आमदार किरण पावसकर यांच्यासह युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष निरंजन डावखरे उपस्थित होते.
ऑलिम्पिकमधील अनुभवाचा अगामी स्पर्धांमध्ये कसा फायदा होईल यावर कविता म्हणाली की, "माझी ही यावर्षातील रिओ मधील तिसरी मॅरेथॉन स्पर्धा होती. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवल्याने मला चांगला अनुभव मिळाला. त्यामुळे येणा-या वर्षांमध्ये मोठ्या स्पर्धा असल्याने नक्कीच त्या अनुभवाचा फायदा मला मिळेल. आफ्रिकन खेळाडू अनेक ट्रॅक अँड फिल्ड स्पर्धांमध्ये आघाडीवर असतात पण, आपल्या खेळाडूंनी देखील त्यांना चांगली टक्कर दिली आहे."

संबंधित विषय
ताज्या बातम्या