Advertisement

बुद्धिबळ : कझाकस्तानची गुलिश्कन तिसऱ्या विजेतेपदासह अाघाडीवर


बुद्धिबळ : कझाकस्तानची गुलिश्कन तिसऱ्या विजेतेपदासह अाघाडीवर
SHARES

कझाकस्तानची महिला ग्रँडमास्टर गुलिश्कन नाखबायेव्हा (एलो २३२३) हिने अापल्या खेळात सातत्य राखत सलग तिसरा विजय मिळवून एसबीअाय लाइफ-एअायसीएफ महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्या फेरीअखेर तीन गुणांसह वैयक्तिकपणे अाघाडी घेतली अाहे. चेंबूर येथील द एकर्स क्लबवर सुरू असलेल्या या स्पर्धेत गुलिश्कन हिने दुसऱ्या फेरीत भारताची महिला अांतरराष्ट्रीय मास्टर वंतिका अग्रवाल (अलो २२७९) हिला तर तिसऱ्या फेरीत भारताची महिला अांतरराष्ट्रीय मास्टर अाकांक्षा हगवणे हिच्यावर सहज विजय मिळवला.


मोंगोलियाची बाखुयाग दुसऱ्या स्थानी

मोंगोलियाची अव्वल मानांकित अांतरराष्ट्रीय मास्टर बाखुयाग मुंगूनटुल (एलो २४१०) हिने दुसऱ्या फेरीत भारताची महिला अांतरराष्ट्रीय मास्टर मोनिषा जी. के. (२२९५) हिच्यावर मात करत गुलिश्कनसह संयुक्तपणे अाघाडी घेतली होती. मात्र तिसऱ्या फेरीत खराब कामगिरी केल्यामुळे तिला अाघाडी टिकवता अाली नाही. बाखुयाग अाणि व्हिएतनामची महिला ग्रँडमास्टर थि किम फुंग वो २.५ गुणांसह दुसऱ्या स्थानी अाहेत.


वंतिका अग्रवालने दिली टक्कर

मुंगूनटुल हिला तिसऱ्या फेरीत भारताची महिला अांतरराष्ट्रीय मास्टर वंतिक अग्रवाल हिच्याविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. वंतिकाने अापला बचाव भक्कम ठेवल्यामुळे बाखुयाग हिला अाक्रमक चाली रचूनही तिचा बचाव भेदता अाला नाही. त्यामुळे बाखुयागसमोर बरोबरी पत्करण्यावाचून कोणताही पर्याय उरला नाही.


तिसऱ्या फेरीनंतर ही स्थिती

बेल्जियमची अांतरराष्ट्रीय मास्टर अॅना झोझुलिया ही २ गुणांसह चौथ्या क्रमांकावर अाहे. उझबेकिस्तानची महिला ग्रँडमास्टर गुलरुखबेगिम तोखीरजोनोव्हा (२३७९), वंतिका अग्रवाल अाणि अाकांक्षा हगवणे या तिघी प्रत्येकी १.५ गुणांनिशी संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर अाहेत.


हेही वाचा -

१२ अव्वल महिला बुद्धिबळपटू विजेतेपदासाठी लढणार

बुद्धिबळपटू अाकांक्षा हगवणेची दमदार सुरुवात

संबंधित विषय