Advertisement

बुद्धिबळपटू अाकांक्षा हगवणेची दमदार सुरुवात


बुद्धिबळपटू अाकांक्षा हगवणेची दमदार सुरुवात
SHARES

भारताची महिला अांतरराष्ट्रीय मास्टर अाकांक्षा हगवणे (एलो २२९७) हिने दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत बेल्जियमची अांतरराष्ट्रीय मास्टर अॅना झोझुलिया हिला बरोबरीत रोखण्याची करामत केली. चेंबूर येथील द एकर्स क्लबवर सुरू असलेल्या एसबीअय लाइफ-एअायसीएफ महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अाकांक्षा हगवणेने अापल्यापेक्षा वरचढ असलेल्या अॅनाविरुद्ध सुरेख चाली रचत प्रतिस्पर्धीवर दडपण अाणले होते. अखेर ४०व्या चालीनंतर दोघींनीही बरोबरी पत्करण्याचे मान्य केले.


गुलरुखबेगिमची बरोबरी

पहिल्या पटावर, उझबेकिस्तानची महिला ग्रँडमास्टर गुलरुखबेगिम तोखीरजोनोव्हा (एलो २३७९) हिने रशियाच्या महिला अंतरराष्ट्रीय मास्टर एलेना तोमिलोव्हा (एलो २३३४) हिच्याविरुद्ध बरोबरी पत्करली. त्यामुळे दोघींनाही अर्ध्या गुणावर समाधान मानावे लागले.


या परदेशी खेळाडूंचे विजय

व्हिएतनामची महिला ग्रँडमास्टर थि किम फुंग वो (एलो २३७६), कझाकस्तानची महिला ग्रँडमास्टर गुलिश्कन नाखबायेव्हा (एलो २३२३) अणि विजेतेपदासाठीची प्रबळ दावेदार समजली जाणारी मोंगोलियाची अंतरराष्ट्रीय मास्टर बाखुयाग मुंगूनटुल (एलो २४१०) यांनी अापल्या पहिल्या फेरीच्या लढतीत विजय मिळविताना भारताच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.


दिव्या, मोनिषा, श्रीजा पराभूत

थि किम फुंग वो हिने दिव्या देशमुख (एलो २१३८) हिला पराभूत केले. गुलिश्कन हिने महिला अांतरराष्ट्रीय मास्टर मोनिषा जी.के. (एलो २२९५) हिच्यावर मात केली. बाखुयाग हिने महिला अांतरराष्ट्रीय मास्टर श्रीजा शेषाद्री (एलो २२०७) हिच्यावर सहज विजय मिळवला.


हेही वाचा -

स्पर्धाच नको!

१२ अव्वल महिला बुद्धिबळपटू विजेतेपदासाठी लढणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा