सचिनवर आधारित माहितीपट 'लिटल मास्टर'

Mumbai
सचिनवर आधारित माहितीपट 'लिटल मास्टर'
सचिनवर आधारित माहितीपट 'लिटल मास्टर'
सचिनवर आधारित माहितीपट 'लिटल मास्टर'
See all
मुंबई  -  

येत्या 24 एप्रिलला सचिनच्या 44 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्याच्या 24 वर्षाच्या कारकिर्दीतील विश्वचषक विजयावर प्रकाश टाकणारी 'लिटल मास्टर' हा माहितीपट प्रसारीत होणार आहे. सोनी ईएसपीएन या चॅनेलवर हा माहितीपट दाखवण्यात येईल. या माहितीपटात 2011 मध्ये भारताने मुंबईत जिंकलेली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा याच्याबद्दलचा आढावा यात असेल. तसंच क्रिकेट या खेळातून सचिन देशाला कसा सर्वोच्च पदावर नऊन ठेवतो. याचं चित्रण तसेच विश्वचषक जिंकणे हे त्याच्यासाठी किती महत्त्वाचं होतं, याचं विश्लेषण सचिननं या माहितीपटात सांगितलंय. सोबतच संघातील सहकाऱ्यांनी देखील विश्वचषक जिंकणे हे किती महत्त्वाचे होते, हे देखील या माहितीपटातून सांगण्यात आलंय. 2011 मधील हा ऐतिहासिक विजय होता, त्याचा प्रवास यात सांगितलाय.चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम शर्मा यांनी केले आहे. या माहितीपटातून भारताच्या ऐतिहासीक विजयाबद्दल माहिती तसेच तो सचिनसाठी किती महत्त्वाचा आहे, याची देखील माहिती यातून देण्यात आली आहे. त्यामुळे नक्कीच त्याच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची गोष्ट असेल.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.