Advertisement

मुंबईत पहिल्यांदाच लुडो स्पर्धा आयोजित


मुंबईत पहिल्यांदाच लुडो स्पर्धा आयोजित
SHARES

कुणा कुणाला लुडो आठवतो? नक्कीच आठवत असणार. लुडो असा गेम आहे जो कुणीच कधी विसरू शकणार नाही. प्रत्येकाच्या लहानपणीची एक आठवण म्हणून मनाच्या एका कोपऱ्यात आजही हा लुडो जिवंत आहे. पण कालबाह्य होणाऱ्या या गेमनं पुन्हा एकदा एन्ट्री घेतली आहे. पूर्वी सुट्टीत खेळला जाणारा लुडो आता प्रत्येकाच्या स्मार्टफोनवर पाहायला मिळतोय. लुडोची रीएन्ट्री झाल्यापासून कॉलेज कॅम्पस, कट्ट्यांवर आणि घराघरात फावल्या वेळेत लुडो खेळला जातोय.



१४ नोव्हेंबर म्हणजेच चिल्ड्रन्स डेच्या निमित्तानं तुमच्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होणार आहेत. का? लहानपणीची एक आठवण असणाऱ्या या लुडोची मोठी स्पर्धा मुंबईत भरणार आहे. पहिल्यांदाच मुंबईत अशा प्रकारे लुडोची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.


कुठे आणि कधी आहे स्पर्धा?

१२, १३ आणि १४ नोव्हेंबरला लुडो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. लुडो स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करण्यासाठी https://goo.gl/forms/AxNXRN97jGdg6c3E3 या लिंकवर क्लिक करा.


दिवस
वेळ
पत्ता
१२ नोव्हेंबर (रविवार)
संध्याकाळी ५ ते ९
  आय.सी. कॉलनी, दहीसर (पश्चिम)
१३ नोव्हेंबर (सोमवार)
संध्याकाळी ५ ते ९
 चार बंगलो, अंधेरी (पश्चिम)

 

या स्पर्धेचा फायनल राऊंड १४ नोव्हेंबरला होईल. हा फायनल राऊंड कुठे आणि कधी होईल, हे मात्र १३ नोव्हेंबरला कळवण्यात येईल.


स्पर्धेची फी किती?

लुडो स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना ३൦൦ रूपये मोजावे लागतील. पेटीएम आणि ऑनलाइन ट्रान्सफरनं तुम्ही फी भरू शकता. ३൦൦ रूपयांमध्ये स्पर्धेसाठी १൦൦ रूपये आणि व्हाऊचरचे २൦൦ रूपये आकारले जातील. स्पर्धेच्या ठिकाणी अनेक स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे या व्हाऊचरवर तुम्ही एखादी वस्तू देखील खरेदी करू शकता.


विजेत्यांसाठी काय बक्षिस?

विजेत्याला ट्रॉफी आणि २൦൦൦ रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर देण्यात येणार आहे. तुम्ही कुठल्याही स्टोअरमध्ये जाऊन हे व्हाऊचर खर्च करू शकता.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा