जय कवळी बॉक्सिंग फेडरेशनच्या महासचिवपदी

 Pali Hill
जय कवळी बॉक्सिंग फेडरेशनच्या महासचिवपदी

मुंबई - भारतीय मुष्टियुद्ध महासंघाच्या अध्यक्षपदी अजयसिंग आणि महासचिवपदी मुंबईतील जय कवळी यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी झालेल्या भारतीय मुष्टियुद्ध महासंघाच्या निवडणुकीत जय कवळी यांनी प्रतिस्पर्धी लेनी डिगामा यांचा पराभव केला. कवळी यांना 48 तर डिगामा यांना 12 मते मिळाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजय सिंह यांना 49 आणि त्यांचे प्रतिस्पर्धी लेनी डिगामा यांना 12 मते मिळाली. कवळी यांची महासंघाच्या महासचिवपदी निवड झाल्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबईतील बॉक्सर्सना प्रधान्य मिळेल, अशी आशा बाळगली जात आहे.

Loading Comments