Advertisement

एटीपी स्पर्धेत 50 हजार डॉलर्सचे पारितोषिक


एटीपी स्पर्धेत 50 हजार डॉलर्सचे पारितोषिक
SHARES

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) च्या वतीने होणाऱ्या एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारतातील अव्वल खेळाडू सहभागी होणार आहेत. यावेळी पुणेकरांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंना पाहण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा पुण्यातल्या म्हाळुंगे येथील बालेवाडी संकुलात होणार आहे. यामध्ये मुंबईतले खेळाडू देखील सहभागी होणार आहेत. चर्चगेट येथे झालेल्या पत्रकार परिषदेत एमएसएलटीए) च्या संघटनेने ही माहिती दिली.


विजेत्यांना काय मिळणार पारितोषिक?

या स्पर्धेत 80 एटीपी गुणांची कमाई करणारा विजेता, तर 48 एटीपी गुण करणाऱ्याला उपविजेता ठरवले जाईल. यावेळी विजेत्याला 7 हजार 200 डॉलर (4.8 लाख) सोबत तर उपविजेत्याला 4 हजार 53 डॉलर (2.7 लाख) रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.




या खेळाडूंचा सहभाग

ही स्पर्धा 13 ते 18 नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत स्लोवाकियाचा कावसिच ब्लाज, मोल्दोरियाचा रॅड्यू अलबोर्ट आणि भारताचे लॉन टेनिस स्टार खेळाडू खेळतील. स्पर्धेची पात्रता फेरी ही 11 आणि 12 नोव्हेंबरला होणार असून 13 नोव्हेंबरला मुख्य फेरीला सुरुवात होणार आहे. खेळाडूंना या स्पर्धेतून एटीपी गुण मिळवण्याची संधी असेल या गुणांचा त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर फायदा होणार आहे.


भारताची ढाल या खेळाडूंवर

गतवर्षीच्या स्पर्धेत उपविजेता ठरलेला प्रज्नेश गुणेश्वरनही थेट मुख्य फेरीतून खेळेल. या स्पर्धेत आर्यन गोवियास, एन. श्रीराम बालाजी आणि अर्जुन काधे यांना वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळणार आहे. नुकताच व्हिएतनाम दुहेरी चॅलेंजर विजेता साकेत मायनेनी याला देखील वाइल्डकार्ड प्रवेश देण्यात आला आहे. दुखापतीमुळे साकेतची सध्या क्रमवारी 912 व्या स्थानावर गेली आहे. एटीपी स्पर्धेतील त्याच्या कामगिरीवर क्रमवारीत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारताचा अव्वल एकेरी खेळाडू युकी भांबरी 140 आणि रामकुमार रामनाथन 148 स्थानावर आहे. तर भारताची ढाल या खेळाडूंवर असणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा