Advertisement

अखेर शिवछत्रपती पुरस्कारांना मुहूर्त मिळाला

आता दरवर्षी शिवजंयतीच्या पूर्वसंध्येला १७ किंवा १८ फेब्रुवारी रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्याची घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली असली तरी भाजप सरकारच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात हा पहिलावहिला कार्यक्रम तर ठरणार नाही ना, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.

अखेर शिवछत्रपती पुरस्कारांना मुहूर्त मिळाला
SHARES

तब्बल तीन वर्षांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून दुसऱ्यांदा या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. मात्र आपल्या कार्यकाळात पहिल्यांदाच शिवछत्रपती पुरस्कारांचं वितरण करण्याची प्रक्रिया राज्य सरकारनं राबवली आहे.

आता दरवर्षी शिवजंयतीच्या पूर्वसंध्येला १७ किंवा १८ फेब्रुवारी रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्याची घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली असली तरी भाजप सरकारच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात हा पहिलावहिला कार्यक्रम तर ठरणार नाही ना, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.


'गेट वे' वर वितरण

शिवछत्रपती पुरस्कारांच्या इतिहासात पहिल्यांदाच ऐतिहासिक अशा 'गेट वे ऑफ इंडिया'च्या साक्षीने या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. १७ फेब्रुवारी २०१८ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांच्या वितरण सोहळ्याला सुरुवात होईल. सुरुवातीलाच तिन्ही वर्षांच्या जीवनगौरव पुरस्कारांचं वितरण राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने २०१४-१५, १५-१६ आणि १६-१७ या वर्षांच्या शिवछत्रपती पुरस्कारांचे वितरण केलं जाईल.


ऑनलाइनद्वारे झाली प्रक्रिया

पहिल्यांदा आम्ही जेव्हा शिवछत्रपती पुरस्कारांचे वितरण केलं, तेव्हा नियमांत अनेक गफलती आढळून आल्या. त्यामुळे आम्ही सर्वच क्रीडा संघटना, क्रीडापटू यांच्याशी चर्चा करून समितीची स्थापना करून नियमांत सुधारणा केल्या. त्यानंतर पुरस्कारांसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली.

त्यानंतरही ज्यांना हरकती, तक्रारी असतील त्यांच्या शंकांचं निरसन करण्यात आलं. २०१४-१५ सालासाठी २२३ अर्ज आले, त्यापैकी ७२ जणांना शिवछत्रपती पुरस्कार देण्यात आले. २०१५-१६ साठी २४१ मधून ५९ तर २०१६-१७ साठी ३१२ अर्जांमधून ६४ जणांची शिवछत्रपती पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली.


जीवनगौरव पुरस्कार:

रमेश तावडे- अॅथलेटिक्स १४-१५, पुणे
अरुण दातार- मल्लखांब १५-१६, पुणे
बिभीषण पाटील- पॉवर-बॉडी बिल्डिंग १६-१७, कोल्हापूर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा