Advertisement

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ गारद


राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ गारद
SHARES

राष्ट्रीय अजिंक्यपदक कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत गारद झाले. याआधी झालेल्या लढतीत महाराष्ट्राच्या मुले आणि मुलींच्या संघानी बिहारला 22-21 आणि हिमाचल प्रदेशला 29-21 असे कडवे आव्हान देत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला होता. पण उपउपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाला हवे तसे यश मिळवता आले नाही. 

19 व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा ही झारखंड येथील डुमका येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशातून प्रत्येक राज्यातील संघाने सहभाग घेतला होता.


साईच्या अंकितची चमकदार कामगिरी

या उपउपांत्य फेरीत मुले आणि मुली विभागात साई सेंटरने विजेतेपद मिळवत दुहेरी मुकूट पटकावला. साईने मुलांच्या गटात उत्तर प्रदेशचा प्रतिकार २७-१५ असा संपुष्टात आणत विजेतेपदावर आपली मोहर उमटवली. मुलांच्या गटात साईच्या अंकितने चमकदार कामगिरी केली. तर मुलींच्या गटात विजेतेपद मिळवताना साईने हरियाणावर २९-२० असा विजय मिळवला. साईने तामिळनाडूला, तर हरियाणाने छत्तीसगडला पराभूत करत मुलींच्या गटात अंतिम फेरी गाठली होती. मुलांच्या गटात साईने तामिळनाडूला, तर उत्तर प्रदेशने मध्य प्रदेशाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.


महाराष्ट्राचे दोन्ही संघ गारद

महाराष्ट्राची पाटी या वर्षी देखील कोरिच राहिली. महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीतच गारद झाले. छत्तीसगडने महाराष्ट्राच्या मुलींना २१-१५ असे, तर उत्तर प्रदेशने महाराष्ट्राच्या मुलांना ३४-२० अशा फरकाने पराभूत केले. या चुरशीच्या लढतीत महाराष्ट्राच्या खेळाडूंना जास्त गुणसंख्या करण्यात यश आले नाही.

या स्पर्धेत महाराष्ट्र संघात मुंबईकर खेळाडूंचा देखील सहभाग होता. मुलींच्या संघात एकूण 5 जणी होत्या. तर मुलांच्या संघात 3 मुंबईकर खेळाडूंचा यामध्ये समावेश होता.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा