Advertisement

टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे जैष्णव शिंदे, सोनल पाटील विजयी


टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे जैष्णव शिंदे, सोनल पाटील विजयी
SHARES

रमेश देसाई मेमोरियल अंडर-12 टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या जैष्णव शिंदे, सिद्धार्थ मराठे यांनी, तर मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या सोनल पाटील, अन्या जेकब या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत आगेकूच केली. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

जी. ए. रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथील टेनिस कोर्टवर ही स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राच्या बिगरमानांकित जैष्णव शिंदेने तिसऱ्या मानांकित आणि आंध्रप्रदेशच्या कार्तिक वडीपल्लीचा 6-3, 6-4 असा पराभव करून खळबळजनक असा निकाल नोंदवला. मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या सोनल पाटील हिने कडवी झुंज देत दिल्लीच्या आणि चौथ्या मानांकित लक्ष्मी गौडाचा टायब्रेकमध्ये 7-6(6), 6-7(2), 6-1असा पराभव करून आगेकूच केली. गुजरातच्या पवित्रा पारीख हिने हरियाणाच्या आणि सहाव्या मानांकित नंदिनी दीक्षितला 6-4, 6-3 असे पराभूत केले. अलिशा देवगांवकर हिने कर्नाटकच्या आणि आठव्या मानांकित वैभवी सक्सेनावर 6-3, 6-0 असा विजय मिळवला. तामिळनाडूच्या अनन्या एसआर हिने पश्चिम बंगालच्या आणि अकराव्या मानांकित भूमी शेखरचे आव्हान 6-4, 6-0 असे संपुष्टात आणले. तामिळनाडूच्या कुंदना बंडारू हिने उत्तरप्रदेशच्या आणि सोळाव्या मानांकित सासा कटियारला 6-0 असे नमवले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा