मॅनेजिंगने मारली बाजी

मॅनेजिंगने मारली बाजी
मॅनेजिंगने मारली बाजी
मॅनेजिंगने मारली बाजी
See all
मुंबई  -  

वांद्रा एमआयजी क्लबमध्ये रविवारी पार पडलेल्या टी10 टूर्नामेंटमध्ये मॅनेजिंग कमिटी संघाने बाजी मारली. एमआयजी क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या टूर्नामेंटमध्ये 'मुंबई लाइव्ह' मीडिया पार्टनर होती.

दरवर्षी प्रमाणे यंदाही एमआयजी क्लबतर्फे टी10 टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 4 संघांचा यात समावेश होता. विशेष म्हणजे या स्पर्धेत बाहेरील संघ नसून, क्लबमधील कर्मचारी आणि पदाधिकारी यांचे होते. 

सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेत मॅनेजिंग कमिटीने बाजी मारली. अंतिम सामना मॅनेजिंग कमिटी विरुद्ध जिम एचसी या संघामध्ये झाला. 

या सामन्यात माजी रणजी खेळाडू अमित दाणी याचा देखील सहभाग होता. उत्कृष्ट फलंदाज म्हणून अक्षय बोरकर (मॅनेजिंग कमिटी), तर उत्कृष्ट गोलंदाज कौस्तूप गुप्ते आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून प्रसाद गोरे यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.