Advertisement

ग्रँड मास्टर फारुख संयुक्त आघाडीत


ग्रँड मास्टर फारुख संयुक्त आघाडीत
SHARES

वांद्रे येथील माऊंट लिटेरा स्कूल इंटरनॅशनलच्या सभागृहात सुरू असलेल्या दहाव्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम मानांकित ताजिकिस्तानचा ग्रँड मास्टर अमानातोव्ह फारुख विरुद्ध भारताचा इंटरनॅशनल मास्टर रघुनंदन श्रीहरी यांच्यातील लढत निकाली झाली. दुसऱ्या स्थानावरून संयुक्त आघाडीत अग्रस्थानी जाण्याच्या इराद्याने फारुखने विजयी खेळ केला.

रघुनंदनने डावाची सुरुवात वजीरासमोरील प्याद्याने करताच फारुखने किंग्ज इंडियन बचाव पद्धतीचा वापर केला. दहाव्या चालीला घोड्याचे बलिदान देऊन फारुखने प्रतिस्पर्ध्याच्या राजावर वजीर व हत्तीच्या सहाय्याने जोरदार आक्रमण केले. 18 चालींनंतर परत एक घोडा व हत्तीचे बलिदान देऊन तिसाव्या चालीला रघुनंदनच्या राजावर मात केली आणि फारुखने एक गुण वसूल करीत अग्रस्थानासाठी पाचवा गुण मिळविला.

तसेच, ग्रँड मास्टर रेहमान झिऔरने इंटरनॅशनल मास्टर रत्नाकरणचा, ग्रँड मास्टर ग्रोव्हर साहजने फिडे मास्टर कार्थिक वेंकटरमणचा, ग्रँड मास्टर देविअत्किन आंद्रेईने राहुल व्ही.एस.चा, ग्रँड मास्टरहोसैन इनॅमुलने तामिळनाडूच्या दिलीप कुमारचा, तर ग्रँड मास्टर निलोत्पल दासने महिला फिडे मास्टर जीशिथाचा पराभव करून पाचव्या गुणाची नोंद केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा