डीएसीसी रंगतदार सामन्यात विजयी

  Mumbai
  डीएसीसी रंगतदार सामन्यात विजयी
  मुंबई  -  

  चर्चगेट - फुटबॉलच्या सुपर डिव्हिजन सामन्यात डीएसीसी चॅरिटेबल असोसिएशनच्या माजी विद्यार्थी संघाने इन्टेलनेट स्पोर्ट्स क्लबला 2/0 ने मात दिली. गोवान्स स्पोर्ट असोसिएशन इथल्या क्रॉस मैदानात झालेल्या या सामन्यात रमेश सिंह आणि एंजलेनो पिकार्डो यांनी गोल केले.

  प्राथमिक फेरीतील आणखी एका सामन्यात सेंट पॉल स्पोर्ट्स क्लबने गोरेगांव स्पोर्ट्स क्लबचा 2 गोलने पराभव केला. तर चेंबूरच्या आरसीएफ ग्राउंडमध्ये झालेल्या फुटबॉल टूर्नामेंट 110 नाडकर्णी कपमध्ये मुख्य संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यामध्ये केंकरे एफसी अंडर -19, मुंबई एफसी अंडर -19, ओएनजीसी, पीफा कुलाबा आणि सेंच्युरी रेयॉन या संघांचा समावेश आहे. क्वॉर्टर फाइनलचे सामने सोमवार आणि मंगळवारी खेळवले जातील.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.