Advertisement

दादर-विरार सायकल शर्यतीवर मेहेरझाद इराणीचे वर्चस्व


दादर-विरार सायकल शर्यतीवर मेहेरझाद इराणीचे वर्चस्व
SHARES

मागील काही शर्यतीपासून आपल्या नावाची दखल घ्यायला लावणाऱ्या मेहेरझाद इराणीने निर्विवाद वर्चस्व राखत राईप मँगो स्पोर्टसतर्फे अायोजित दादर विरार सायकल शर्यतीचे विजेतेपद मिळवले. या शर्यतीत मेहेरझादने तब्बल तीन मिनिटांच्या फरकाने प्रथम स्थान मिळवले. सुमारे 82 किलोमीटर अंतराची ही शर्यत मेहेरझादने १ तास २७ मिनिटे ४४४ सेकंद अशा वेळेत पूर्ण केली.


सुरुवात संथ, शेवट वेगवान

दादर-नायगाव भागातील लोकसेवा हायस्कूल इथून सुरू झालेली ही शर्यत सुरुवातीला काहीशी संथ वेगाने पुढे सरकत होती. ठाण्यातील घोडबंदर परिसरात आल्यावर मात्र सायकलपटूंनी आपला वेग वाढवला. सर्वच सायकलपटू एकाच जथ्यात जात असल्यामुळे शर्यतीत रंग भरला. दरम्यान, नायगाव-वसई पार केल्यावर मेहेरझादने मुसंडी मारत आघाडी घेतली. या दरम्यान सकाळच्या वाऱ्याचा फायदा उचलत मेहेरझादने ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखत रोख २१ हजार रूपये आणि गौरवचिन्ह आपल्या नावावर केले.


तिघेजण दुसऱ्या स्थानी

मेहेरझादनंतर तिघा सायकलपटूंनी एकत्रितपणे अंतिम रेषा पार केली. या खेळाच्या आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे या तिघाच्या नावे १ तास ३० मिनीटे ४८ सेकंद अशी वेळ नोंदवण्यात आली. त्यात फोटोफिनिशनुसार प्रकाश ओळेकर दुसऱ्या तर सूर्या थाठू तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. प्रकाशला 18 हजार तर सूर्याला 15 हजार रुपयांच्या रोख पुरस्काराने गौरवण्यात आले. मुंबईतील 100 हून अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतलेल्या या शर्यतीत पहिल्या दहा क्रमांकाच्या सायकलपटूंना रोख पुरस्कार देण्यात आले.


हेही वाचा -

दादर-विरार सायकल शर्यत २९ एप्रिलला रंगणार

'सायकल' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा