मुंबई स्नूकर लीगमध्ये एमजी हेझागोन विजयी

  Matunga
  मुंबई स्नूकर लीगमध्ये एमजी हेझागोन विजयी
  मुंबई  -  

  ऑर्टस् क्लबने आयोजित केलेल्या मुंबई स्नूकर लीग (एमएसएल)-2017 या स्पर्धेत एमजी हेक्झागोन (माटुंगा जिमखाना) संघ विजयी ठरला. दर्शन शाह आणि अंकित ठक्कर यांच्या चमकदार कामगिरीमुळे संघाला हा विजय मिळवता आला. एमजी हेक्झागोनने डीपीसीजी स्टार बॉय (दादर, पारसी जिमखाना) यांना हरवून आपले वर्चस्व राखले. माटुंगा जिखान्याने घरच्या मैदानावर 3-0 अशा फरकाने विजय मिळवला.

  पण माटुंगा जिमखान्याला या सामन्यात पारसी जिमखान्याच्या विरोधात थोडी मेहनत घ्यावी लागली. बोनस पॉईंटमुळे माटुंगा जिमखानाला 3-2 अशा फरकाने विजय साकारता आला.

  माटुंगाच्या दर्शन विरुद्ध जेशाद दुमासिया (पारसी जिमखाना) यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात 107-87 अशा फरकाने दर्शनने विजय मिळवला. 

  याच दरम्यान झालेल्या सांताक्रूझ सनरायझर्सची लढत पीजेएचजी सी बिस्किट्स (हिंदू जिमखाना) यांच्यासोबत झाली. या सामन्यातल्या दोन्ही फेरीत 3-2, 3-2 अशा गुणसंख्येने सामना बरोबरीत राहिला.  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.