फुटबॉल लीगमध्ये 'मोगवीरा'च अव्वल

  Mumbai
  फुटबॉल लीगमध्ये 'मोगवीरा'च अव्वल
  मुंबई  -  

  क्रॉस मैदान - रामनाथ पय्यादे मेमोरियल फुटबॉल लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोगवीरा स्पोर्ट्स क्लबने जय भारत स्पोर्ट्स क्लब संघाला 7- 6 ने पराभव केला आणि या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

  कर्नाटक स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात दोन्ही टीम गोल करु शकल्या नाहीत. त्यामुळे सामना टाय ब्रेकरमध्ये गेला. 5 पॅनल्टी घेऊनही दोन्ही संघ बरोबरीवर राहिले. शेवटच्या क्षणी सामन्याचा निर्णय कळण्यासाठी सडन डेथ (sudden death) ची घोषणा करण्यात आली. ज्यात जय भारत टीमच्या सौमिल डामोरला हरवून मोगवीराने सामना जिंकला. मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे चेअरमन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मोगवीरा संघाला ट्रॉफी दिली गेली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.