Advertisement

अायडीबीअाय मुंबई अर्धमॅरेथाॅनमध्ये १६ हजार धावपटूंचा सहभाग


अायडीबीअाय मुंबई अर्धमॅरेथाॅनमध्ये १६ हजार धावपटूंचा सहभाग
SHARES

भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या मान्यतेने ३० सप्टेंबर २०१८ रोजी वांद्रे कुर्ला संकुलातील जिअो गार्डन्सपासून सुरुवात होणाऱ्या अायडीबीअाय फेडरल लाइफ इन्श्युरन्स मुंबई अर्धमॅरेथाॅन शर्यतीत तब्बल १६ हजार धावपटू मुंबईतील रस्त्यांवरून धावणार अाहेत. ५ के फन रन, १० के टाइम रन अाणि २१ किमी. अर्धमॅरेथाॅन शर्यत अशा तीन गटांत होणाऱ्या या स्पर्धेला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हिरवा झेंडा दाखवून सुरुवात होणार अाहे.


स्पर्धकांमध्ये वाढ

तीन गटांत होणाऱ्या या स्पर्धेत तब्बल ५ हजार धावपटूंनी अर्धमॅरेथाॅन शर्यतीत भाग घेतला अाहे. १० के टाइम रनमध्ये यावर्षी ७००० धावपटू सहभागी होणार अाहेत तर ५ के फन रनमध्ये तब्बल ४००० स्पर्धक धावणार अाहेत. या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच अव्वल धावपटूंची वेळ सुधारण्यासाठी त्यांच्या दिमतीला १० महिला अाणि ३ पुरुष पेसर्स असतील.


मुंबईतील जनता तसेच वेगवान वयोगटातील धावपटू अापल्या तंदुरुस्तीबाबत वचनबद्ध असल्याचे गेल्या दोन पर्वांमध्ये दिसून अाले अाहे. या वर्षी धावपटूंची वाढलेली संख्या हे त्याचेच लक्षण अाहे. मुंबईतील बहुसंख्य जनता निरोगी जीवनशैलीवर भर देत अाहेत.
- मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर


हेही वाचा -

क्रांती साळवीची नऊवारी नेसून मॅरेथाॅनमध्ये धाव, गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद

ब्रेट लीने घेतलं बाप्पाचं दर्शन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा