Advertisement

ब्रेट लीने घेतलं बाप्पाचं दर्शन


ब्रेट लीने घेतलं बाप्पाचं दर्शन
SHARES

अाॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली सध्या सामाजिक कार्यानिमित्त मुंबईत अाला अाहे. अाॅस्ट्रेलियानंतर मुंबई हेच त्याचं दुसरं घर असतं. सध्या मुंबईत असलेल्या ब्रेट लीनं मुंबईतील सर्वात श्रीमंत मंडळ असा नावलौकिक मिळवणाऱ्या जीएसबी सेवा मंडळाच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. क्रीम कलरचा कुर्ता घालून ब्रेट ली मंडपात अवतरला अाणि सर्वांनाच अाश्यर्याचा धक्का बसला. त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली.कर्णबधीर संस्थेलाही भेट

अाॅस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज अाणि कूचलिअरचा ग्लोबल हिअरिंग अॅम्बेसेडर असलेला ब्रेट ली सध्या अावाज एेकू येण्याच्या समस्येवरील उपाययोजनांचा प्रसार करण्यासाठी भारतात अाला अाहे. याचनिमित्ताने त्याने अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट अाॅफ स्पिच अँड हिअरिंग डिसेबलिटीज संस्थेला भेट दिली. नवजात बालकांची अावाजाची अाणि कानाची चाचणी करायला हवी. त्याचबरोबर यूनिव्हर्सल न्यूबाॅर्न हिअरिंग स्क्रिनिंग बंधनकारक करण्यात यावे. तरच कर्णबधीरतेवर मात करता येईल. यावेळी ब्रेट लीने अापली स्वाक्षरी असलेली बॅट मुलांना भेट दिली.


हेही वाचा -

अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या १९ वर्षांखालील संघात निवड

'बाॅक्सिंग रिंगचा किंग' माइक टायसन मुंबईत येणारसंबंधित विषय
Advertisement