Advertisement

क्रांती साळवीची नऊवारी नेसून मॅरेथाॅनमध्ये धाव, गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद


क्रांती साळवीची नऊवारी नेसून मॅरेथाॅनमध्ये धाव, गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद
SHARES

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात थोडंसं जरी पळालो तरी अनेकांना धाप लागते. ही मंडळी मॅरेथाॅनमध्ये धावण्याचा विचारही करू शकत नाहीत. संपूर्ण कपड्यांनिशी ४२ किलोमीटरचं अंतर पार करणे म्हणजे महादिव्यच म्हणावं लागेल. हे महादिव्य पार करण्याचं काम मुंबईच्या क्रांती साळवी यांनी केलं अाहे. नऊवारी नेसून मॅरेथाॅन शर्यत पूर्ण करणाऱ्या क्रांती साळवी यांनी गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डसमध्ये अापल्या नावाची नोंद केली अाहे. नुकत्याच झालेल्या बर्लिन मॅरेथाॅनमध्ये ३ तास ५७ मिनिटे अाणि ७ सेकंदात महिलांची पूर्ण मॅरेथाॅन पार करत अापल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला अाहे.


अशी सुचली नऊवारीची कल्पना

१२ वर्षांपूर्वी मॅरेथाॅन शर्यतीत धावण्यास सुरुवात करणाऱ्या क्रांती साळवी यांनी सुरुवातीला अर्धमॅरेथाॅन शर्यतींमध्ये नशीब अजमावले. हाफमॅरेथाॅन सहजपणे पार करू शकतो, असा अात्मविश्वास मिळाल्यानंतर त्यांना पूर्ण मॅरेथाॅनमध्ये म्हणजेच ४२.१९२ किलोमीटर शर्यतीकडे अापला मोर्चा वळवला. त्यातच मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी त्या गुढीपाडव्याच्या दिवशी नऊवारी साडीत धावल्या. तेव्हाच नऊवारी साडी नेसून मॅरेथाॅन शर्यतीत धावण्याचा संकल्प त्यांनी केला.



अायती संधी मिळाली

बर्लिन मॅरेथाॅन अाणि गिनिजबुक अाॅफ वर्ल्ड रेकाॅर्डस समिती यांच्यात भागीदारी असल्यामुळे त्यांना नऊवारी साडी नेसून गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये अापले नाव नोंदवण्याची अायती संधी मिळाली. त्यानंतर बर्लिन मॅरेथाॅनमध्ये त्यांनी नऊवारी साडी नेसून ३ तास ५७ मिनिटांत ही शर्यत पूर्ण केली. नऊवारी साडी नेसून सर्वात वेगवान वेळ नोंदवल्याबद्दल त्यांची गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद झाली अाहे. ही शर्यत पूर्ण केल्यानंतर त्यांना गिनीज बुक अाॅफ वर्ल्ड रेकाॅर्डसकडून प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात अाला.


हेही वाचा -

सचिन तेंडुलकरने अायएसएलच्या केरळ ब्लास्टर्समधील हिस्सा विकला

ब्रेट लीने घेतलं बाप्पाचं दर्शन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा