Advertisement

सचिन तेंडुलकरने अायएसएलच्या केरळ ब्लास्टर्समधील हिस्सा विकला


सचिन तेंडुलकरने अायएसएलच्या केरळ ब्लास्टर्समधील हिस्सा विकला
SHARES

क्रिकेटचा शहेनशहा सचिन तेंडुलकरने केरळ ब्लास्टर्स एफसी (केबीएफसी) या इंडियन सुपर लीगमधील फ्रँचायझीमध्ये असलेला अापला २० टक्के हिस्सा विकला अाहे. अायएसएलच्या स्थापनेपासून म्हणजेच २०१४ पासून चार वर्षे केरळ ब्लास्टर्ससोबत जोडल्या गेलेल्या सचिन तेंडुलकरने पाचव्या मोसमापासून फारकत घेतली अाहे. मात्र किती कोटी रुपयांचा व्यवहार झाला, हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात अाले अाहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हिस्सा विद्यमान भागीदार अायक्वेस्ट, अभिनेता चिरंजीवी अाणि अल्लू अरविंद यांनी विकत घेतला अाहे. या तीन भागीदारांच्या नावावर अाधीच ८० टक्के हिस्सा होता.


सचिन तेंडुलकरचे खूप सहकार्य अाम्हाला लाभले. केरळ ब्लास्टर्स एफसीसाठी दिलेल्या मौल्यवान योगदानाबद्दल अाम्ही सचिनचे अाभारी अाहोत. यलो अार्मीचे अाम्ही यापुढेही सदस्य राहू. सचिनने अापला हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला असला तरी अाता अाम्हाला पुढे मजल मारायची अाहे. खेळ, चाहते अाणि केरळच्या खेळभावनेकरिता अाम्ही खिलाडीवृत्तीने हा निर्णय स्वीकारला अाहे. यूएईस्थित व्यावसायिक एम.ए. युसूफ अली हे सचिनचा हिस्सा विकत घेणार असल्याच्या वावड्या पसरवल्या जात होत्या. मात्र त्यात कोणतेही तथ्य नाही.
- केरळ ब्लास्टर्स एफसी


२०१४मध्ये विकत घेतला संघ

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने एप्रिल २०१४ मध्ये उद्योजक प्रसाद व्ही. पोटलुरी यांच्यासह कोचीस्थित केरळ ब्लास्टर्स एफसी ही फ्रँचायझी विकत घेतली होती. २०१५ मध्ये प्रसाद अाणि त्यांच्या पीव्हीपी व्हेंचर्स या कंपनीने अापला हिस्सा विकला. त्यानंतर सचिनकडे या संघाची ४० टक्के मालकी होती. २०१६ मध्ये प्रसाद यांच्यासह दक्षिण चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत अभिनेते सचिनसह या संघाच्या दिमतीला उभे राहिले. अाता या अभिनेत्यांकडे ६० टक्के अाणि सचिनचा २० टक्के इतका हिस्सा अाहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा