Advertisement

भारत श्री स्पर्धेत मुंबईकरांवर सर्वांच्या नजरा


भारत श्री स्पर्धेत मुंबईकरांवर सर्वांच्या नजरा
SHARES

इंडियन बाॅडीबिल्डिंग फेडरेशनतर्फे ११वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पुण्यात २३ ते २५ मार्चदरम्यान रंगणार अाहे. शरीरसौष्ठवाच्या इतिहासात पहिल्यांदाच ६०० शरीरसौष्ठवपटू अापल्या पीळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन दाखविण्यासाठी या स्पर्धेत उतरणार अाहेत. या स्पर्धेत विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश अाणि सरकारी संघटना असे मिळून ४३ यूनिटमधील शरीरसौष्ठवपटू सहभागी होणार अाहेत. भारत श्री स्पर्धेत विजेत्यांवर ५० लाख रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव करण्यात येणार असून किताब विजेत्याला साडेसात लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार अाहे. पुण्यातील बालेवाडी इथल्या शिवछत्रपती स्पोर्टस काॅम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा रंगणार अाहे.


मुंबईकर शरीरसौष्ठवपटू सज्ज

महाराष्ट्रातून ४४ खेळाडूंचा संघ या स्पर्धेसाठी निवडण्यात अाला असला तरी सर्वांच्या नजरा असतील त्या मुंबईकर शरीरसौष्ठवपटूंवर. सुनीत जाधव, नितीन म्हात्रे, सागर कातुर्डे, अक्षय मोगरकर, अतुल अांब्रे यांच्यावर संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात अाहे. त्यांच्यासमोर सेनादलाच्या जावेद अली खान, भास्करन, किरण पाटील, प्रीतम चौघुले तसेच सीअारपीएफचा प्रीतम सिंग, राम तुडू अाणि अोरिसाचा अनिल गोचीकार यांचे अाव्हान असेल.


सुनीत जाधव हॅटट्रिकसाठी उत्सुक

तब्बल पाच वेळा महाराष्ट्र श्री अाणि दोन वेळा राष्ट्रीय श्री स्पर्धेवर हुकूमत गाजवणारा मुंबईचा बाहुबली सुनीत जाधव अाता भारत श्री स्पर्धेत हॅटट्रिक लगावण्यासाठी सज्ज झाला अाहे. २०१६ मध्ये रोहा इथं झालेल्या अाणि २०१७ मध्ये गुरगाव इथं झालेल्या राष्ट्रीय श्री अजिंक्यपद स्पर्धेत सुनीत जाधवनं बाजी मारली होती. अाता पुण्यातील बालेवाडीत रंगणाऱ्या भारत श्री स्पर्धेत तो विजेतेपदाची हॅटट्रिक साजरी करतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे.


हेही वाचा -

सुनित जाधवची फाइव्हस्टार कामगिरी, सलग पाचव्यांदा 'महाराष्ट्र श्री'

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा